मुंबई – आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील 11 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, चेन्नईने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत तर पंजाबने दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
चेन्नई वि. पंजाब या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहेत. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या आयपीएलमध्ये जडेजाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे.
जडेजाने प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला आहे. तुषार देशपांडेच्या जागी ख्रिस जॉर्डनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. हरप्रीत ब्रारच्या जागी वैभव अरोरा आणि राज बावाच्या जागी जितेश शर्मा. प्लेइंग-11 मध्ये बेअरस्टोला संधी मिळाली नाही.
पंजाब किंग्सचा संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ : ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी.