मुंबई – अमिताभ बच्चन आणि इम्रान हश्मीच्या “चेहरे’बाबत पहिल्यापासूनच खूप चर्चा व्हायला लागली होती. आता सिनेमा रिलीज व्हायची वेळ आली होती, म्हणून प्रमोशनसाठीही ही चर्चा सुरू होती.
View this post on Instagram
यातच आता ‘चेहरे’ हा चित्रपटाच्या रिलीझची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 27 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आनंत पंडित यांनी ही घोषणा केली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी “चेहरे’चा रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यावर अनेक निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमांचे रिलीज 2021 मध्ये करण्याचे ठरवले होते. मात्र आता हा चित्रपट 27 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये अन्नू कपूर, रिथिमान चॅटर्जी, रघुबीर यादव आणि रिया चक्रवर्ती हे देखील लीड रोलमध्ये दिसणार आहेत.