अकोला – राज्यात करोनाचा धोका कमी होत असताना अचानक ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. असे असताना विदर्भातील अकोला व चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण मिळाले आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील एका ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्ण याआधी करोना पॉझिटिव्ह होता. त्यानंतर रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले त्यामध्ये डेल्टा प्लस आढळून आला आहे. या रुग्णांची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील सुमठाणा परिसरात डेल्टा प्लस व्हेरिअंटचा पहिला बाधित रुग्ण मिळाला आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग यांनी दिली असून या रुग्णांची प्रकृती चांगली आहे.
दरम्यान, आरोग्य विभाकडून या भागीतल नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्यात करण्यात येणार असून जिल्हास्तरावरुन एक पथक अकोट येथे पाठविण्यात आले आहे.