कुनो – मध्य प्रदेशातील कुनो वन्यजीव अभयारण्यातून एक गुड न्यूज आली आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये मंगळवारी तीन नवीन चित्त्याची पिल्ले जन्माला आली आहेत. नामिनियातून आणलेली मादी चित्ता ज्वालाने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. तिन्ही पिल्ले पूर्णपणे निरोगी आहेत. याआधीही ज्वाला चित्ताने चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यापैकी तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. नामिबियन चित्ता आशाने तिच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर हे घडले आहे.
आता कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्यांची संख्या १७ झाली आहे. यात सात बछड्यांचाही समावेश आहे. सुमारे महिनाभरापूर्वी नामिबियातून आणलेल्या आशा या मादी चितेने तीन पिल्लांना जन्म दिला होता. सध्या या पिल्लांना एका मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले असून, तेथे डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः ही माहिती दिली.
कुनो अभयारण्यात चित्ते आणण्याचा विषय वादाच्या केंद्रस्थानी आला होता. विशेषत: आफ्रिकेतून त्यांना भारतात आणल्यावर इकडचे वातावरण मानवेल का, यावर हा संपूर्ण वाद रंगला होता. त्यातच एका चित्त्याचा अल्पावधीत मृत्यु झाल्यानंतर या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, नव्या वातावरणाशी जुळवून घेताना वन्यप्राण्यांमध्ये हे जन्म-मृत्युचे चक्र सुरुच रहाततासते, त्यात वावगे असे काही नाही, असा निर्वाळा वन्ययाभ्यासकांनी दिल्यानंतर या वादावर पडला आहे.