नारायणगाव -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिकादिन साजरा करण्यात आला, अशी माहिती मुख्याध्यापिका सीमा हांडे आणि संगीता ढमाले यांनी दिली. बालिकादिनानिमित्त शाळेत बाल आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षकांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील ओवी गायन करून अभिवादन केले.
बालआनंदमेळाव्यात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामधून सावित्रीच्या लेकी आम्ही नाही खचणार, संघर्ष करून आम्ही पुढेच जाणार, अशी प्रतिज्ञा करुन लेक शिकवा-लेक वाचवा- देश वाचवा. पर्यावरणाचे रक्षण करा. कचराकुंडीचा वापर करू-सुंदर परिसर निर्माण करू, प्लास्टिक बंदी आणि पाण्याची बचत असे सामाजिक संदेश देण्यात आले. आर्दश गाव बस्तीच्या सरपंच माया रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंगणवाडीच्या कार्यकर्त्या संध्या गोरडे, अरुणा गिदे आणि गावातील महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.