मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. इतके दिवस सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करणारी करिश्मा अखेर एनसीबीसमोर हजर झाली आहे.
दरम्यान या प्रकरणात, एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात होता. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याची भीती वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले आहे. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.