मुंबई -राज्यात आज 5 नोव्हेंबरपासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. योगा, स्वीमिंगपूलसह बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शूटिंग रेंज आदी इनडोअर खेळांनाही परवानगी दिली आहे. नाट्यगृहेही खुली होत आहेत.
कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होईल. चित्रपटगृह सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉकला परवानगी नाकारली आहे. कंटेन्मेंट झोनमधील चित्रपटगृह आणि नाट्यगृहांवरील बंदी आहे. राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता ‘हेमंत ढोमे’ याने ट्विटकरत आपले मत व्यक्त केले आहे. “या संकटातुन मनोरंजन क्षेत्राला सावरायला वेळ लागेल’ असं तो म्हणाला.
अखेर ५ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह ५०% क्षमतेने पुन्हा सुरू!
या संकटातुन मनोरंजन क्षेत्राला सावरायला वेळ लागेल पण सुरूवात तर नक्की होईल… 👍🏻
गणपती बाप्पा मोरया… 🙏🏽 pic.twitter.com/Cm1GvtDcaw— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) November 4, 2020
“अखेर 5 नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह 50 % क्षमतेने पुन्हा सुरू! या संकटातुन मनोरंजन क्षेत्राला सावरायला वेळ लागेल पण सुरूवात तर नक्की होईल, गणपती बाप्पा मोरया… ” या आशयाचे ट्विट हेमंतने केले आहे.