नवी दिल्ली – नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज शुक्रवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. बुधवारी त्यांनी या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांना या खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील डबघाईला आलेल्या कंपन्या आणि एअर इंडिया विक्री प्रक्रिेयेला न मिळणारा प्रतिसाद अशा वातावरणात त्यांना हे खाते सांभाळायचे आहे.
त्यामुळे त्यांच्या पुढे मोठी आव्हाने आहेत. शिंदे यांनी या आधी युपीए सरकारच्या काळात विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळले आहे. 2007 ते 14 या सात वर्षांच्या काळात ते कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
मार्च 2020 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 1971 साली जन्मलेले ज्योतिरादित्य शिंदे हे हार्वर्ड विद्यापीठात शिकलेले आहेत.