विशेष रेल्वेंच्या वेळापत्रकात दि.1पासून बदल

पुणे – मध्य रेल्वेच्या पाच विभागांतून सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. दि.1 डिसेंबरपासून गाड्या नवीन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

रेल्वेची प्रवासी सेवा अद्यापही रुळावर आलेली नाही. रेल्वेकडून विशेष प्रवासी गाड्या सोडण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागांतून सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याची माहिती रेल्वेकडून जाहीर करण्यात आली.

मुंबई-पुणे विशेष गाडी (02015) सीएसएमटी येथून सकाळी 5.40 वाजता सुटणार असून पुण्यात 9.05 वाजता पोहोचणार आहे. दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, शिवाजीनगर या ठिकाणी या गाडीला थांबा आहे.

पुणे-मुंबई विशेष गाडी (02016) सायंकाळी 6.35 वाजता सुटून रात्री 10 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. यासह पुणे-मुंबई विशेष गाडी (02124) सकाळी 7.15 वाजता सुटणार असून, सीएसएमटी येथे 10.25 वाजता दाखल होणार आहे. या गाडीला दादर येथे थांबा देण्यात येणार आहे. तर सीएसएमटीहून विशेष गाडी (02123) येथून सायंकाळी 5.10 वाजता सुटून, रात्री 8.25 वाजता पुण्यात दाखल होणार आहे.

यासह पुणे-नागपूर-पुणे विशेष सुपरफास्ट, पुणे-अजनी-पुणे, पुणे-अमरावती-पुणे विशेष, पुणे-दानापूर -पुणे, पुणे- जयपूर द्वि साप्ताहिक विशेष, पुणे- जबलपूर- पुणे साप्ताहिक विशेषसह पुण्यामार्गे जाणाऱ्या सीएसएमटी – गदग, बंगळुरू, कोल्हापूर-गोंदिया, मुंबई-कोल्हापूर-मुंबई विशेष, मुंबई-सोलापूर, मुंबई-लातूर-मुंबई विशेषसह मुंबई – मनमाड-मुंबई विशेष, मुंबई-नागपूर-मुंबई विशेष, मुंबई-आदिलाबाद-मुंबई विशेष एक्‍स्प्रेसच्यादेखील वेळा आणि थांब्यांमध्ये बदल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.