कृष्णा श्रॉफने ट्रोलची केली बोलती बंद

सोशल मीडियावर सेलिब्रिटींची एक भली मोठी फॅन फॉलोइंग असते. पण या चाहत्यांमध्ये असेही काही लोक आहेत जे नेहमीच नकारात्मक टिप्पण्या देऊन ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, कधीकधी या ट्रॉल्सना सेलिब्रिटींकडून सडतोड उत्तर मिळते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

काही दिवसांपूर्वीच तापसी पन्नूने ट्रोलला दिलेल्या सडेतोड उत्तराचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. यानंतर आता टायगर श्रॉफची बहीण कृष्णानेही असेच काहीसे केले आहे. कृष्णा श्रॉफने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)


कृष्णाने तिच्या एका फॉलोअर्ससोबच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. वास्तविक कृष्णाने इंस्टाग्रामवर आरशात पाहत असतानाचा सेल्फी शेअर केला होता. यावर एका ट्रोलने लिहिले की, “तू तुझ्या चेहऱ्यास काही केले आहे का? तू वेगळीच दिसत आहेस.’ या ट्रोलस्‌च्या कमेंटवर कृष्णाने लिहिले, मित्रा, प्रत्येकजण समजतो की मी कॉस्मेटिक सर्जरीद्वारे काही केले आहे. पण, हे मेकअप असून याला लिप्स ओव्हरलाइनिंग असे म्हणतात. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)


आपण त्या स्त्रियांच्या सानिध्यात असता ज्या रात्री काही दिसतात आणि सकाळी काहीतरी वेगळे. कृष्णाच्या उत्तराने ट्रोलची बोलती बंद झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृष्णा श्रॉफने आपला बॉयफ्रेंड ऍबन हायम्ससोबत ब्रेकअप झाल्याची माहिती शेअर केली होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.