बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात येत आहे. कारण तिने कोणतीही पडताळणी न करता एका शेतकरी आंदोलनाशी संबंधित एका फेक ट्विटला रिट्विट केले होते. यानंतर ती ट्रोल झाल्याने तिने ते डिलीट केले होते. दरम्यान, लोकांनी त्याच्या स्क्रीनशॉट काढत तिला पुन्हा ट्रोल करत आहेत.
कंगनाने रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये किसान प्रोटेस्टचा एक भाग असलेल्या वृद्ध शेतकरी महिलेचे शाकिन बागचे बिलकिस बानो, असे वर्णन केले होते. यात असे लिहिले होते की, रोजच्या मजुरीनुसार हे काम आजी करतात. यावर कंगनाने टोमणा मारला पोस्ट केली की, हा हा हा, ही तिच आजी आहे जीला टाईम मासिकाने भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये समाविष्ट केले. ती 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
कंगनाचे हे ट्विट प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आले. यानंतर तिने हे ट्विट डिलीट केले होते. परंतु एका युझरच्या पोस्टर कंगणाने लिहिले की, खूपच एक्साइटेड होत आहे… जास्त एक्साइटेड होणे तुझ्यासारख्या जयचंदसाठी चांगले नाही. ही फेक न्यूज नसून माझे सोर्सेज अजूनही व्हेरिफाय करत आहे. यावर तुझा काय सोर्स आहे, असा युझरने सवाल केला होता.