कर्जत -कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद गटात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. अशाच काही नवीन विकास कामांचा शुभारंभ व पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा मिरजगाव जिल्हा परिषद गटात स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.मतदार संघातील विकास कामांवर राज्यातील सत्ता बदलाचा कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले .
निमगाव गांगर्डे येथील सीना कालवा अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन, गावातील डांबरी रस्त्याचे लोकार्पण, बेळगाव येथील स्मशानभूमी भूमिपूजन व घन कचरा व्यवस्थापन कामाचे भूमिपूजन, मिरजगाव येथे निमगाव डाकू ते गुरवपिंपरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, मिरजगाव येथील पोलीस ठाण्याला पोलीस वाहन भेट, गोंदर्डी ते थेटेवाडी डांबरी रस्त्याचे भूमिपूजन, चिंचोली काळदात येथील अंगणवाडी इमारत लोकार्पण व पानंद रस्ता लोकार्पण इत्यादी कार्यक्रम आमदार पवार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, परमवीर पांडूळे यांच्यासह गावागावांमधील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरजगाव जिल्हा परिषद गटातील अनेक प्रलंबित प्रश्न आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावले आहेत. रखडले रस्ते, आरोग्य सुविधा, स्वतंत्र पोलीस ठाणे आणि शाळांच्या भौतिक सुविधांकडे आमदार विशेष लक्ष देत जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास होत आहे
परमवीर पांडूळे, माजी जिल्हा परिषद सदस्य.