पुणे, – सन 1827 पासून सतत नाविन्याचा शोध घेत आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण दागिन्यांचे असंख्य प्रकार सादर करणारे नांव म्हणजे चंदूकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा.लि. याच परंपरेतून आता या पेढीने पारंपारिकतेला नाविन्याची जोड देत ट्रेंडी डिझाईन्सचा सुरेख संगम असणाऱ्या आणि ठुशी अशीच हवी हे घोषवाक्य सादर केलेल्या ठुशी महोत्सवात प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाटणाऱ्या डिझायनर ठुशींचे विविध प्रकार सादर केले आहेत.
कोल्हापुरी दागिना म्हणून ओळख असलेली ठुशी आज महाराष्ट्रात कुठल्याही समारंभात, उत्सवात आवडीने घातली जाते. चोकर नेकलेस शैलीमध्ये सोन्याचे मणी एकमेकात जवळून गुंफून ठुशीची रचना केली जाते. या पेढीने सादर केलेल्या ठुशी महोत्सवातील ठुशींचे खास कलेक्शन पारंपारिक डिझाईन्सला नाविन्याची सुरेख झालर देत तयार करण्यात आले असून यामध्ये विविध प्रकारच्या रंगीत स्टोन्सचा वापर करण्यात आला आहे. साऱ्याच डिझायनर ठुशींबरोबर मॅचिंग कानातले सुध्दा उपलब्ध आहेत.
चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्या सर्व शाखेमध्ये ठुशी महोत्सवाचे आयोजन 26 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या ठुशी 3 ग्रॅम पासुन उपलब्ध असून रू. 14,900/- पासून पुढे अशी ठुशींची किेंमत सादर केली आहे. तसेच फॉर्मिंग ठुशीवर एम.आर. पी.किंमतीवर 10 टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे.
चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्या सोन्याच्या ठुशी कलेक्शन बघण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या नजिकच्या स्टोअरमध्ये जाऊन ठुशीची खरेदी करा असे आवाहन चंदुकाका सराफ ऍन्डचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी केले आहे.