चंदुकाका सराफ अँड सन्स कडून दिवाळीसाठी दागिन्यांचे खास कलेक्‍शन

पुणे – सामाजिक भान ठेवत दीपोत्सवाच्या उत्साहात कुठेही कमी पडू नये यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्स यांनी त्यांचे नवे कलेक्‍शन – गार्गी गोल्ड कलेक्‍शन व अमुल्या डायमंड कलेक्‍शन दिवाळीसाठी सादर केले आहे. या कलेक्‍शनमध्ये सोने, हिरे आणि चांदीच्या अंगठ्या, हार, पेंडंट सेट, झुमके आणि तन्मणी यांचा समावेश आहे. 

अत्यंत कलाकुसर व नाजूक रचनांमधून विविध सण समारंभ, ऑफिस पार्टीज्‌, घरगुती समारंभ व अन्य प्रसंगांमध्ये या दागिन्यांचा आनंद घेता येईल. गार्गी गोल्ड कलेक्‍शनमधील दागिन्यांच्या मजुरीवर 40% पर्यंत सूट देण्यात आली असून अमुल्या डायमंड कलेक्‍शनवर मजुरीवर 100% पर्यंत सूट आणि नायरा डायमंड कलेक्‍शनचे मजुरीवर 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. चांदी आणि स्वॉरोस्कीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 10 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. 1 ग्रॅम ज्वेलरीवर एमआरपीवर 10 टक्‍के सूट आहे.

चंदुकाका सराफ यांच्या सण आनंदाचा / फेस्ट ऑफ ज्वेल्स या थिमखाली लॉंच करण्यात आलेल्या मनमोहक व आकर्षक दागिन्यांची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर ऑफर्स 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. सदर दागिने चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्या जवळच्या शाखेतून अथवा ऑनलाइनही खरेदी करता येते. आकस्मिक घटनांना तोंड देण्याची उर्मी भारतातील नागरिकांमध्ये असल्याने या फेस्टिव्हल सीझनमध्ये जोश आणण्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.