मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित करण्यात आला होता.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच ताणली गेली. टीझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण? असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे.
View this post on Instagram
आज (दि.16) या चित्रपटाचा आणखी एक टिझर प्रदर्शित करण्यात आला असून, चंद्रमुखी चित्रपटातील कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. पहिल्या टीझरमध्ये पहिल्या प्रमाणाने पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ध्येयधुरंदर राजकारणी तुम्हाला दिसतो. या दमदार दौलतच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता “आदिनाथ कोठारे’ दिसणार आहे. स्वतः आदिनाथने त्याच्या इंस्टाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
29 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला राजकारणी आणि नृत्यागणा मधील ओढ पाहता येणार आहे. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे. यापूर्वी देखील प्रसाद यांनी ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ या सारख्या दमदार चित्रपटांची निर्मिती केली असून, हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडले आहेत. दरम्यान, चंद्रमुखी चित्रपटाबद्दल आणखी सांगायचे झाल्यास या चित्रपटातला अजय – अतुल या दमदार जोडीने संगीत दिले आहे.