मुंबई – ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून त्यांनी हा टोला लागवल्याचे म्हंटले आहे. त्यांचा या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
राजकीय वर्तुळात पेटलेल्या या प्रकारवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांतदादांनी सारवासारव केली आहे.
दरम्यान,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे.रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर ठरत म्हंटले आहे की,’दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असा इशारा त्यांनी दिला आहे.