‘चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना माझ्या शुभेच्छा’- संजय राऊत

मुंबई –  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जहरी टीका केली आहे.  हे नागालँडचे राज्यपाल होणार असे मी ऐकले आहे. त्यामुळेच पाटील यांनी  माजी मंत्री म्हणू नका असे म्हंटले आहे. 

ते पुढे म्हणाले,’चंद्रकांत  पाटील हे आमचे मित्र आहे मात्र,  राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. पाटील हे अवतारी अन् चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. मात्र माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो.’ 

‘मी त्यांना निरोप पाठवला आहे की, पुढील  २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावं लागणार आहे. कारण उद्धवजींच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकार कायम राहणार आहे. कुणालाही स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल” असं म्हणत पाटील यांचा माजी मंत्री म्हणून नका या विधानावर  राऊत टीका केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.