Chandrahar patil join Shivsena UBT : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर निशाणा साधताना म्हटले की, पळकुटे पक्षातून पळून जात आहेत, पण मर्द शिवसेनेत येत आहेत. तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आपल्या सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो. आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली ते काही मी सांगू शकत नाही. पण मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणाची छाती होणार नाही. पक्षातले पळपुटे पळून जात आहेत, पण मर्द सहभागी होत आहेत. कारण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे. मी लहान होतो तेव्हा मारुती माने होते, ते घरी यायचे, बाळासाहेबांशी बोलायचे, भेटायचे. तीच परंपरा आता कायम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. | Chandrahar patil join Shivsena UBT
चंद्रहार यांचं शिवसेनेत स्वागत करत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही काहीतरी संकेत द्या, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती, पण जनतेने संकेत दिल्यानंतर आणखी काय संकेत द्यायचे? गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभातात. गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. | Chandrahar patil join Shivsena UBT
आज सांगली येथील प्रसिद्ध कुस्तीपटू, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. pic.twitter.com/jEssY2WHQ4
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 11, 2024
मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे. कारण गद्दारांना आडवं करायचं आहे. या हुकूमशाहीविरोधात लढताना तुमच्यासारखे पैलवान हे शिवसेनेत आले आहेत. भविष्य तुमच्या हातात आहे. कारण संपूर्ण जनता आपल्याकडे आशेने पाहत आहे. आजच्या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास दृढ झाला असेल की, आपल्यासाठी कुणीतरी लढत आहे. कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षांच्या गदाचं वजन खूप मोठं आहे. ते आपल्याला पेलायचं आहे. ते पेलणं तुमच्या मजबूत खांद्याला शोभण्यासारखं आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या लोकसभा संघटकपदी चंद्रहार यांची नेमणूक करत आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. | Chandrahar patil join Shivsena UBT