ओझर (प्रतिनिधी) – नारायणगाव येथील श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन सुभाष कांकरिया , उपाध्यक्षपदी धनेश बाळासाहेब शेलोत तर सचिव पदी निर्मल सुभाष मुथ्था यांची निवड करण्यात आली, अशी माहिती पिठाशीनधिकारी सुयोग अशोक गांधी यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक अशोक बन्सीलाल गांधी यांच्या उपस्थितीत व सुयोग अशोक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आले होती. या बैठकीत नव्याने स्थापन झालेल्या श्री आनंद पतसंस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थापक सचिन सुभाष कांकरिया, उपाध्यक्षपदी धनेश बाळासाहेब शेलोत तर सचिव पदी निर्मल सुभाष मुथ्था यांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक रमेश सुभाष चोरडिया, स्वप्निल प्रवीण भन्साळी, महावीर अशोक खिवंसरा, संदेश सतीश कोठारी, हेमा शशिकांत लोढा, भक्ती आनंद पोखरणा, दर्शना दत्तात्रय सरवदे – बोरा, विशाल विजयकुमार वरवंटे, सुरेश कृष्णजी गोसावी, कल्पेश जवाहर गुगळे, शुभम संजय मुनोत, व्यवस्थापक पूजा विठ्ठल पुंडे आदी उपस्थित होते. यावेळी नवीन पदाधिकारी यांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अशोक बन्सीलाल गांधी यांच्या यांच्या हस्ते करण्यात आला.