कोलकत्ता – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा नड्डा हे निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. डायमंड हार्बर भागात त्यांची प्रचार सभा होती. सभेसाठी जात असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली.यावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक
#WATCH They (BJP) has no other work. At times Home Minister is here, other times its Chaddha, Nadda, Fadda, Bhaddha is here. When they’ve no audience, they call their workers for doing Nautanki: West Bengal CM Mamata Banerjee addressing a public rally in Kolkata pic.twitter.com/uXrIyhdrj2
— ANI (@ANI) December 10, 2020
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
“हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच “देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे?
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशातच या राज्यात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा नड्डा सभेसाठी या भागाकडे येत असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे आरोप भाजपने केला आहे. परंतु, हे आरोप तृणमूल पक्षाने फेटाळून लावले आहेत.