कर्जत : कर्जत तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बेस्ट क्राइम इन्व्हेस्टिगेशन पुरस्कार जाहीर झाला असल्याने रायगड पोलीस दलासह सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर हे परभरणी जिल्ह्यातील जितूर तालुक्यात सन 2016 ते 2019 या कालावधीत पोलीस उपविभागीय अधिकारी पदाची जबाबदारी संभाळत असताना जितूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.
या घटनेमुळे एकीकडे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली संतापाची लाट, तर घटनेचा एक ही साक्षीदार व पुरावे नसताना या घटनेचा बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या प्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी घेरडीकर व बोरी पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी तातडीने तपास यंत्रणा फिरवत गोळा केलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
त्या आरोपीस परभरणी जिल्हा सत्र न्यायलयात हजर करून या गुन्ह्यात आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा या महत्व पूर्ण कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कर्जत तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांना बेस्ट क्राइम इन्व्हेस्टिगेशन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.