2076 बाधितांपैकी 1754 जणांची करोनावर मात : 51 जणांचा मृत्यू
राजगुरूनगर – खेड तालुक्यात आतापर्यंत 2076 बाधितांपैंकी 1754 जणांनी करोनावर मात केली असून 271 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत 33 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी राजगुरूनगर (1), चाकण (16), आळंदी (0), अशा तीन नगरपरिषदांमिळून 17 तर ग्रामीण भागातील निघोजे (3), कुरूळी (2), चिंबळी (1), मेदनकरवाडी (1), बहूळ (2), धानोरे (3), चऱ्होली खुर्द (2), संतोषनगर (1), हेंद्रूज (1) या 9 गावांत एकूण 16 जण करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
आनांदाची बाब म्हणजे खेड तालुक्यात रुग्ण संख्या घटण्याबरोबरच उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे असल्याने तालुक्यात पसररलेली करोना विषाणू संसर्गाची भीती दूर झाली आहे. तालुक्यात चांडोली येथे 40 ऑक्सिजन बेडला मान्यता मिळाल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. करोना संसर्ग काळात प्रशासन आणि नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावल्याने तालुक्यातील वाढती संख्या रोखण्यात यश आले आहे.
चाकण परिसर वगळता तालुक्यातील इतर गावांमध्ये करोना रुग्ण संख्या कमी झाली आहे.तालुक्यात करोनामुळे 51 व्यक्तींचे मृत्यू झाले असून त्यात वृद्ध नागरिकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागांत 27, चाकण नगरपरिषद हद्दीत 13, आळंदी नगरपरिषद हद्दीत 8 तर राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाले आहेत.