Apple Alert Row: देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आयफोनवर पाठवलेल्या अॅपल अलर्टबाबत सत्ताधारी भाजपवर सडकून टीका झाल्यानंतर आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारकडून या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, कंपनीकडूनही या नोटिसीवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसवर अॅपलने आपली बाजू मांडली आहे. आम्ही बाहेरून तज्ञांना बोलावून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानंतर जो काही निकाल येईल त्याची संपूर्ण माहिती देऊ.” असे म्हटले गेले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या हेरगिरी प्रकरणांबाबत खासदारांना अॅपलकडून अलर्ट मिळाल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सरकारने, ‘सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी सीईआरटी-इनने अॅपलने पाठवलेल्या अलर्ट संदेशाच्या मुद्द्याची चौकशी सुरू केली आहे. जी विरोधी पक्षांच्या खासदारांनी उपस्थित केली होती. यासंदर्भात कंपनीला नोटीसही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अॅपल कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या याविषयी वक्तव्य दिलेले नाही. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही संपूर्ण परिस्थितीचे आकलन करत आहोत आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते त्यांच्या मुख्यालयाशी सतत संपर्कात आहेत.”असे म्हटले. तसेच, ‘आवश्यक असल्यास आम्ही गोपनीयतेचे आणि उपकरणांचे काम सोपवण्यात आलेल्या टीम्सना सामावून घेऊ जेणेकरुन येथे काय घडत आहे हे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपास करता येईल.” असेही कंपनीकडून म्हटले आहे.