अकोले -पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या संकल्पनेने केंद्र सरकार दिव्यांगाना युनिक कार्ड देत आहे. यातून केंद्र सरकारने दिव्यांगाना ओळख निर्माण करुन दिली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
अकोले तालुका पंचायत समिती कार्यालयात भारतीय जनता पार्टी दिव्यांग संघटना व मूकबधीर विद्यालय यांनी केद्र सरकारच्यावतिने दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे युनिक कार्ड वाटप माजी आमदार वैभवराव पिचड यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ताञय देशमुख, पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर, नगरसेविका व भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, नगरसेवक सचिन शेटे, दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पिचड म्हणाले, केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे. आज केंद्र सरकारने प्रत्येक दिव्यांगाना स्वतंत्र अशी ओळख निर्माण करुन देण्याचा उपक्रम घेतला आहे.त्यानुसार आज 90 दिव्यांगाना युनिक कार्ड देण्यात येत आहे. ज्या लोकांची अद्याप कार्ड साठी कागदपत्र देणे बाकी आहे त्यांनी लवकर द्यावी. तालुक्यातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न आपण मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही दिव्यांगाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
यावेळी राहुल देशमुख, विजय पवार, मच्छिंद्र चौधरी, सुशांत वाकचौरे, संजय डोंगरे,बाळासाहेब धुमाळ, ऋषाली झोळेकर, पुष्पा दळवी, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डुबे, मच्छिंद्र पावसे, नानासाहेब दाभाडे, संतोष खताळ, रावसाहेब वाघमारे, शिवाजी शिंदे, सुयोग तोरकडी आदी उपस्थित होते.