आॅस्ट्रेलियाच्या पहिला डावात सर्वबाद ४५४ धावा
सिडनी : मार्नस लबुशेनच्या शानदार व्दिशतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मालिकेतील तिस-या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरूध्द दुस-या दिवशी पहिल्या डावात १५०.१ षटकात सर्वबाद ४५४ धावा केल्या. उर्वरित खेळात न्यूझीलंडने दुस-या दिवसअखेर २९ षटकात बिनबाद ६३ धावा करत खणखणीत प्रत्युत्तर दिले असून ते अजूनही ३९१ धावांनी पिछाडीवर आहेत. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टाॅम लाथम २६ तर टाॅमम ब्लंडेल ३४ धावांवर खेळत होता.
Marnus Labuschagne scored his maiden Test double ton before New Zealand bowled the hosts out for 454.
🇳🇿 finished the day at 63/0.#AUSvNZ REPORT 👇https://t.co/JVOo4My8ij
— ICC (@ICC) January 4, 2020
कालच्या ३ बाद २८३ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियानं धावसंख्येत आणखी १७१ धावांची भर घालत सर्वबाद ४५४ धावा केल्या. आज दुस-या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा आॅस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडच्या रूपात लवकरच चौथी विकेट गमावली. वेड २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर ट्रव्हिस हेड १० आणि टीम पेन ३५ धावांवर बाद झाले.
The dance of the double hundred 🕺 #AUSvNZ pic.twitter.com/l7vDJYoeag
— ICC (@ICC) January 4, 2020
मार्नस लबुशेनने एक बाजूनं डाव सावरत कसोटी कारकिर्दीतील पहिलं व्दिशतक झळकावलं. लबुशेनने ३६३ चेंडूत १९ चौकार व १ षटकारांसह २१५ धावांची खेळी केली. त्याला टाॅड एस्टलनं झेलबाद केल. लबुशेन बाद झाला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ७ बाद ४१६ धावा झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे शेवटचे तीन फलंदाज ३८ धावांत बाद झाले. यामध्ये कमिन्सने ८, पॅटिसनने २ , मिशेल स्टार्कने २२ तर नाथन लायनने नाबाद ६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव : १५०.१ षटकात सर्वबाद ४५४( मार्नस लबुशेन २१५, स्टीव्ह स्मिथ ६३, डेव्हिड वाॅर्नर ४५, टीम पेन ३५, नील वॅगनर ३-६६, डी ग्रँडहोम ३-७८, टाॅड एस्टल २-१११, हेनरी १-९४, समरविले १-९९) वि. न्यूझीलंड : पहिला डाव : २९ षटकात बिनबाद ६३( टाॅम लाथम २६ आणि टाॅम ब्लंडेल ३४ खेळत आहे).