पुणे – छोट्या लोकांची मोठी बॅंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जनता सहकारी बॅंक लि. पुणेचा 72 वा वर्धापनदिन सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात तसेच बॅंकेच्या महाराष्ट्र व गुजरात मधील सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त बाजीराव रोड शाखेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात बॅंकेचे अध्यक्ष सीए माधव माटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, प्रमुख पाहुणे सीए येवलेकर, शाखा व्यवस्थापक विवेक शिरोडे, ग्राहक, हितचिंतक आदि मान्यवर उपस्थित होते. वर्धापनदिनाचे औचित्य साधून बॅंकेच्या विविध शाखांमध्ये हा दिवस गुंतवणूक दिवस, म्युच्युअल फंड, आरोग्य विमा आणि छोटी कर्जवाढ म्हणून साजरा करण्यात आला. सर्व शाखांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॅंकेतील कर्मचारी, ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार व खातेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र, आणि गुजरातमध्ये एकूण 71 शाखा कार्यरत असून या शाखांद्वारे अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. 31 मार्च 2021 अखेर बॅंकेचा एकूण व्यवसाय 14 हजार 321 कोटींपेक्षा जास्त आहे.