मुंबई – इंस्टाग्राम, युट्युबसारख्या सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांसाठी प्रसिद्धीची दारे खुली झाली आहेत. मात्र या प्रसिद्धिपायी अतिरेक केला तर अनेक गोष्टी अंगलट येऊ शकतात. सोशल मीडियावर अनेक बड्या स्टार्सचे डुप्लिकेट आहेत. त्यातीलच एक म्हणजे आझम अली अन्सारी. आझम हा अभिनेता सलमान खानसारखा दिसतो म्हणून अनेकजण त्याला फॉलो करतात. मात्र आता या सलमानच्या डुप्लिकेट गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
आझम रेल्वे ट्रॅकवर टी-शर्टशिवाय इंस्टाग्राम रील बनवत होता. त्यानंतर जीआरपी लखनऊ पोलिसांनी आझम अलीवर रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. ही काही पहिली वेळ नाही, याआधीही सलमान खानचा डुप्लिकेट असलेल्या या व्यक्तीवर शांतता बिघडवण्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
या व्यक्तीने सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ मधील गाण्यावर रील बनवली होती. ही रील आझम अन्सारीने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याच्या विरोधात रेल्वे कायद्याच्या कलम 147, 145 आणि 167 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे.