Vehicle Sales On Gudhipadwa| – मराठी नवीन वर्षाची सुरवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा अमृतयोग साधत पुणेकरांकडून दरवर्षी जोरदार वाहन खरेदी होते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले.
प्रामुख्याने दुचाकी खरेदीची संख्या घटली आहे, तर चारचाकी, रिक्षा आणि बस खरेदीची संख्या गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढली आहे. 2023 मध्ये गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर 7 हजार 706 वाहनांची खरेदी झाली होती. मात्र, यंदा 2024 मध्ये 7 हजार 336 वाहनांची खरेदी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलने यंदा पावणेचारशेने वाहन खरेदी संख्या घटली.
दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चारचाकीचे शहर अशी नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या गुढीपाडव्याला दुचाकी खरेदी संख्या सातशे ते आठशेने कमी झाली आहे. Vehicle Sales On Gudhipadwa|
2023 मध्ये 4 हजार 998, तर 2024 च्या पाडव्याला 4 हजार 221 वाहन खरेदीच्या नोंदी झाल्या आहेत. मात्र, यंदा चारचाकी वाहन खरेदीची संख्या मात्र शंभरने वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर गुड्स, ऑटो रिक्षा, बस आणि टॅक्सी या वाहनांच्या खरेदीची संख्याही वाढली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना मागणी कमी Vehicle Sales On Gudhipadwa|
यंदाच्या पाडव्याला इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोटार वाहन खरेदीची संख्या तुलनेने खूपच घटली आहे. 2023 मध्ये 962 इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी झाल्या. मात्र, यंदा केवळ 88 वाहनांची खरेदी झाली आहे. उन्हाचा वाढता चटका, त्यामुळे घडत असलेल्या आगीच्या घटनांमुळे ही खरेदी घटली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,
तसेच गतवर्षी 46 इलेक्ट्रिक कार खरेदी केलेल्या होत्या, तर यंदा 46 वाहन खरेदी झाल्या. रिक्षा, गुड्स, बस किंवा टॅक्सी याची एकही नोंद झाली नाही. गतवर्षी 1 हजार 49 इलेक्ट्रिक वाहन खरेदी होती, तर यंदा केवळ 137 वाहन खरेदी झाली.
आठवडाभरातील वाहन खरेदी
वर्षे दुचाकी कार गुड्स रिक्षा बस टॅक्सी अन्य वाहने एकूण
2023 4,998 2,214 151 146 4 117 76 7,706
2024 4,221 2326 245 257 45 190 52 7,336
हेही वाचा: