नवी दिल्ली – 43 वर्षीय शिक्षकाने ऑनलाईन डेटसाठी आपल्या पार्टनरला बोलावत त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर शिक्षकाने त्याच्या शरीराचे तुकडे कापून खात हाडे फेकून दिली असून हे हे दोघंही समलैंगिक होेते. हा प्रकार जर्मनीमधील आहे.
स्टीफन वय 41 असे ह्त्या करण्यत आलेल्याचे नाव असून शिक्षकाने पीडित व्यक्तीला भेटण्यासाठी बोलावले व त्यानंतर त्यांची हत्या केली. यानंतर शरीराचे मांस खात हाडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक मागील अनेक दिवसापासून नरभक्षकांबाबतची माहिती सर्च करत होता. यासोबतच त्यानं हेदेखील सर्च केलं होतं, की एखादा व्यक्ती लिंगाशिवाय जिवंत राहू शकतो का? पोलिसांना आरोपी आणि पीडित व्यक्तीचे ऑनलाईन डेटिंग अॅपवरील मेसेजही मिळाले. आरोपी केमिस्ट्री टीचर आहे. त्याच्या घरातून चाकू जप्त करण्यात आला आहे.