राजगुरूनगर -दावडी (ता. खेड) येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यपी वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दावडी गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे राहत असलेले कुटुंब हे म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय करून उपजीविका करीत होते. वडील दारू पिऊन त्यांच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करण्यास लावत होते. मंगळवारी (दि. 10) वडिलांनी मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण केली.
त्याला दिवसभर जेवायला दिले नाही व रात्री गोठ्यामध्ये अंथरूण पांघरून न देता झोपायला लावले. याचा मुलाला राग आल्याने गोठ्यातील लोखंडी घन वडिलांच्या डोक्यात घालून त्यांचा खुन केला केला. या घटनेबाबत आरोपीच्या मोठ्या भावाने फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट दिली.