हिवरे कुंभार येथील देशमुख परिवाराचा निर्णय
शिक्रापूर- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने करण्यात आले आहे. समाजहितसाठी हिवरे कुंभार केशवराव मारुती देशमुख यांचे वुद्धापकाळाने निधन झाले. त्यांनतर त्यांचा दशक्रिया विधी 20 मार्च रोजी असताना करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत दशक्रिया न करण्याचा निर्णय देशमुख कुटुंबातील सदस्यांनी घेतला आहे.
हिवरे कुंभार गावातील महेंद्र देशमुख व काळुराम देशमुख यांचे वडिल केशवराव मारुती देशमुख याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरपले असेल तरी दुखःद प्रसंगातून सावरात सध्या करोना विषाणूच्या आस्मानी संकटात सापडलेल्या या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी केलेले आवाहन त्यापैकी लोकांनी एकत्र येऊ नये, गर्दीच्या माध्यमातून होणारा प्रसार थांबवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे गांभीर्याने दखल घेत सामाजिक बांधिलकी, समाजहित जपत दशक्रिया विधी रद्द करण्याचा निर्णय घेत सामाजिक सलोखा जपत आपल्या भावनाला वाट मोकळी करून देत सहकार्य करण्याची विंनती महेंद्र देशमुख व काळुराम देशमुख या भावंडानी केली आहे. देशमुख परिवाराच्या या निर्णयाचे पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातून ऋण व्यक्त केले जात आहे.