‘…तर सरकारशिवायही प्रश्‍न सोडवता येतात’

पुणे – प्रत्येक माणसात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही भावना असतात. जर माणसातील सद्‌भावना वाढल्या तर प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारचीही गरज भासणार नाही. सामान्य माणसेही आपापसात आपले मोठमोठे प्रश्‍न सोडवू शकतात. आजचा कार्यक्रम हे त्याचेच उदाहरण आहे असे मला वाटते, असे मत नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्‍त केले.

‘अमनोरा येस फाउंडेशन’च्या वतीने दुष्काळग्रस्त जनावरांच्या चारा छावण्यांना चारा पाठवण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. याचे वाटप बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी अमनोरा-सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, भारतीय किसान संघाचे पदाधिकारी माऊली तुपे उपस्थित होते. यावेळी धर्मवीर शंभूराजे गोशाळा, तुकाराम टेकडी हडपसर येथून मारुती आबा तुपे, पुरंदर येथील श्री नाथ कृपा सहकारी नागरी पतसंस्थेकडून मनोहर धुमाळ आणि बलराम चारा छावणी नावळे येथून सागर जगताप यांनी मदत स्वीकारली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.