CAA Notification Modi Sarkar : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नियमांची अधिसूचना आज सोमवारी जारी करण्यात आली. CAA च्या नियमांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नियमांची अधिसूचना जारी करणे हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे.
येत्या काही दिवसांत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी करणे हा एक मास्टर स्ट्रोक आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू झाला आहे. | CAA Notification Modi Sarkar
CAA नुसार भारतीय नागरिकत्व कोणाला मिळणार ?
CAA नियम जारी केल्यानंतर, 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्यांनाच केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकत्व दिले जाईल. | CAA Notification Modi Sarkar
CAA मध्ये कोणत्या धर्मांचा समावेश आहे?
CAA मध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि पारशी अशा सहा गैर-मुस्लिम समुदायांचा समावेश आहे. 31 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी त्यांनी भारतात आश्रय घेतला असेल तरच त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. | CAA Notification Modi Sarkar
CAA कायदा कधी पास झाला ?
सीएए डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला आणि नंतर राष्ट्रपतींची संमती मिळाली परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये याविरोधात निदर्शने झाली. या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम अद्याप अधिसूचित न झाल्याने त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती.