पुणे – आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे आठव्या बिस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे 18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना डब्लूआयआरसी ऑफ स्पर्धेला बिस्मार्ट यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, या स्पर्धेत पुणे विभागातील 60 हुन अधिक नामांकित सीए संस्थानी सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 12 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेत बिस्मार्ट, रॉयल्स, चॅम्प्स सुपर किंग्ज, केपीसीए, वीकेजी स्मॅशर्स, एसआरपीए इलेव्हन,पीएचएम टायगर्स, सीए सुपरकिंग्ज, सीए टायटंस, पेशवा सुपर किंग्स, शार्प्स शुटर्स, स्पे वॉरियर्स हे 12 संघ झुंजणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे सलग आठवे यशस्वी वर्ष असून ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकासाठी करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या सामन्यांचे निकाल क्रिकहिरोज येथे उपलब्ध असणार असून सामन्यांचे प्रक्षेपण युट्यूबवर दाखविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए सुमित शहा, सीए सचिन पारकले, सीए अमोल चंगेडिया, सीए अक्षय पुरंदरे, सीए आनंद गावडे, सीए राजेश मेहता, सीए अल्पेश गुजराथी आणि सीए भूषण शहा यांचा समावेश आहे.