पुणे – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर अकाऊंटस् ऑफ इंडियाच्या डब्ल्युआयआरसी पुणे शाखा तर्फे आयोजित ११ व्या ‘श्री रामकृष्ण ऑईल मिल्स् करंडक’ सीए क्रिकेट लीग (सीएसीएल) २०२४ स्पर्धेत एमबी स्ट्रायकर्स, चॅम्प्स् सुपरकिंग्ज्, बीस्मार्ट इलेव्हन, एएनआरके डायनामोज् आणि एडीएम वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरीसह आगेकूच केली.
शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दर्शन बाहेती याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमबी स्ट्रायकर्स संघाने फिनप्रो ऐसेस् संघाचा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना फिनप्रो ऐसेस् संघाला ५४ धावांचे लक्ष्य उभे केले. अक्षय ओक (२१ धावा) आणि निकुंज बोब्रा (१५ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. दर्शन बाहेती याने १३ धावात २ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. हे लक्ष्य एमबी स्ट्रायकर्सने ५ षटकामध्ये पूर्ण केले. दर्शन बाहेती याने नाबाद ४४ धावांची खेळी केली. दर्शन आणि दर्पण जैन (नाबाद १३) या सलामीवीरांनी अभेद्य भागिदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
#U19WorldCup2024 : टीम इंडियासह ‘हे’ संघ पात्र ठरले सुपर-6 साठी, ICC ने शेअर केली यादी…
ब्रिजभुषण तिवारी याच्या ८१ धावांच्या जोरावर एएनआरके डायनामोज् संघाने एसपीसीएम स्ट्रायकर्स संघाचा ४५ धावांनी सहज पराभव केला. राहूल शहा याच्या फलंदाजीच्या जोरावर एडीएम वॉरीयर्स संघाने व्हीएसएन सुपरकिंग्ज्चा २० धावांनी पराभव करून आगेकूच कली. अमित बलदोटा याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर चॅम्प्स् सुपरकिंग्ज्ने सीए इंडियन्स् संघाचा ८ गडी राखून पराभव केला. साहील पारख याच्या भेदक गोलंदाजीमुळे बीस्मार्ट इलेव्हन संघाने एमएसीए इलेव्हन संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.