U19 World Cup 2024 : भारतासह 9 संघ आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 सुपर-6 साठी पात्र ठरले आहेत. आयसीसीने शनिवारी सकाळी याची घोषणा केली. भारताव्यतिरिक्त बांगलादेशचा संघ आतापर्यंत अ गटातून पात्र ठरण्यात यशस्वी ठरला आहे. तिसरा संघ आयर्लंड किंवा यूएसए असेल, बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे आयर्लंडला चांगली संधी आहे. या गटातील अखेरचा सामना उद्या दुपारी 1.30 वाजता भारत विरूध्द यूएसए याच्यांत होणार आहे.
याव्यतिरिक्त इंग्लंड आणि वेस्ट इंडिज गट-ब मधून, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका गट-क मधून आणि पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ गट-ड मधून पात्र ठरले आहेत. एकूण 12 संघ सुपर-6 साठी पात्र होतील त्यापैकी तीन संघांची घोषणा होणे बाकी आहे. अ, ब आणि क गटातील प्रत्येकी एक संघ सुपर-6 मध्ये पोहोचेल.
The Super Six stage of the #U19WorldCup is shaping up nicely, with three more teams sealing their qualification 👌
More ➡️ https://t.co/Reorym5ydH pic.twitter.com/socHDWktC9
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 27, 2024
सुपर-6 मध्ये 12 संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. पहिल्या गटात अ गट आणि ड गटातील संघ असतील. दुसऱ्या गटात गट-ब आणि गट-ड मधील संघांचा समावेश असेल.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत, प्रथम टीम इंडियाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला आणि नंतर आयर्लंडचा 201 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यूएसएस विरुद्ध टीम इंडियाचा तिसरा आणि औपचारिक सामना बाकी आहे.
26 जानेवारीला झालेल्या तीन सामन्यांनंतर सुपर-6 चे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले. नेपाळने शुक्रवारी अंडर-19 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचा पराभव करून मोठा उलटफेर केला. तर बांगलादेशने अमेरिकेवर विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात जेव्हा इंग्लंडचा सामना वेस्ट इंडिजशी झाला तेव्हा कॅरेबियन संघाने ब्रिटिशांचा पराभव केला.
या तीन सामन्यांपैकी सर्वात रोमांचक सामना होता नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान. नेपाळने अफगाणिस्तानचा मोठा पराभव केला. अफगाणिस्तान संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला होता, तर नेपाळ संघाने पात्रता फेरीतून या स्पर्धेत प्रवेश केला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 145 धावा फलकावर लावल्या होत्या, नेपाळने या धावसंख्येचा पाठलाग 1 गडी बाकी असताना केला.