C Vigil app : आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील ‘सी-व्हिजिल’ अॅप अत्यंत प्रभावी ठरू लागले असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवापर्यंत देशभरातून ७९ हजारहून अधिक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या बहुसंख्य तक्रारींचे तातडीने निवारणही करण्यात आले आहे.
आयोगाकडे आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण झाले असून ८९ टक्के तक्रारी १०० मिनिटांत सोडवल्या गेल्या. ५८ हजारहून अधिक तक्रारी (७३ टक्के) बेकायदेशीर होर्डिग्ज आणि बॅनर्सविरोधात नोंदवल्या गेल्या आहेत. | C Vigil app
पैसे, भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या १४०० हून अधिक तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. २ हजार ४५४ म्हणजे सुमारे ३ टक्के तक्रारी मालमत्तेच्या विद्रूपीकरणाशी निगडित आहेत. | C Vigil app
बंदुकांचे प्रदर्शन आणि धमकावण्यांसंदर्भातही तक्रारी आयोगाकडे नोंदवण्यात आल्या असून ५३५ तक्रारींपैकी ५२९ सोडवल्या गेल्या आहेत. १ हजार तक्रारी निषिद्ध वेळेनंतर स्पीकरचा वापर करून प्रचार केल्याविरोधात होत्या, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. | C Vigil app