पिंपरी, दि. 28 – सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाल्या आहेत. शहरातील 28 घाटांवर महापालिकेच्या वतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे प्रामुख्याने पिंपरीतील झुलेलाल घाट तर चिंचवड येथील घाटावर मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. चिंचवडमध्ये सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकाच सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक रवाना झाली आहे. त्यामुळे मिरवणूक काहीसी रेंगाळल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौकात आणि पिंपरीतील शगुन चौकात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे प्रामुख्याने पिंपरीतील झुलेलाल घाट तर चिंचवड येथील घाटावर मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी चापेकर चौकात रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. साडेचार वाजता शिवतेज मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकाही मोठ्या मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात आली नाही.