पिंपरी, दि. 28 – पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहर आणि परिसरात गणेश विसर्जन मिरवणूकांना मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी, चिंचवडसह शहरातील विविध घाटावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या वतीने शहरातील 28 घाटांवर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम हौद, आपत्ती व्यवस्थनाच्या दृष्टीने जीवरक्षक, सीसीटीव्ही लावले आहेत.
विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त वियनकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच पिंपरीतील शगुन चौक आणि चिंचवडमधील चापेकर चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.