पुणे – पर्यावरण पूरक आणि परकीय चलन वाचविणाऱ्या इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बॅटरी किंवा विद्युत घटांवर चालणाऱ्या बसेस आता सर्वच महापालिका क्षेत्रात दिसू लागलेल्या असताना आता थेट हायड्रोजनवर चालणाऱ्या आणि धूरा ऐवजी पाण्याचे उत्सर्जन करणाऱ्या बसेस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत दिसणार आहेत. या निर्णयामुळे देशाचे हायड्रोकार्बन म्हणजेच कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणाऱ्या परकिय चलनात मोठी बचत होणार आहे. येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.
“ऑलेक्ट्रा’कडून निर्मिती…
मेघा इंजिनियरिंग ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडची (चएखङ) उपकंपनी असलेल्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (जङ) सार्वजनिक वाहतुकीतील आपले नेतृत्व पून्हा एकदा अधोरेखीत केले आहे. पुढील पिढीची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या या हायड्रोजन बसेस लवकरच वाहन बाजारपेठेत दिसू लागतील. रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने हायड्रोजन बसची घोषणा ऑलेक्ट्राने केली आहे.
कार्बनमुक्तीसाठी पर्याय…
वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत. या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला आणखी चालना मिळणार आहे. शहरांत वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण रोखण्यात संपुर्ण कार्बनमुक्त पर्याय म्हणून हायड्रोजन बस उपयुक्त ठरणार आहेत.
टाकी भरल्यानंतर 400 कि.मी…
12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये प्रवाशांसाठी 32 पासून 49 आसनाची व्यवस्था असणार आहे. तर वरील बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर असतील. हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात. एकदा हायड्रोजनची टाकी पूर्ण भरल्यानंतर ही बस 400 कि.मी. पर्यंत सहज प्रवास करू शकेल. या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरण्यासाठी फक्त 15 मिनीटांचा कालावधी लागणार आहे.