मुंबई – बॉलिवूडचा किंग खानने काल आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. किंग खानची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती. सोशल मिडियावर #HappyBirthdayShahRukhKhan , #HappyBirthdaySRK , #HBD_SRK या हॅशटॅगद्वारे ट्विट शाहरुख खानला वृत्तमाध्यमांसह त्याच्या फॅन्सने हटके अंदाजात शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. यातच दुबईमध्ये बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोशनाई करत अनोख्या अंदाजात बॉलिवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेला. यावेळी त्यांच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाणे सुद्धा वाजविण्यात आले होते.
सध्या या अनोख्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला स्वतःहा शारुहखने त्यांच्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर करीत आपल्या फॅन्सला दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद असे कॅप्शन पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, या व्हिडीओला काही तासात तब्बल तीन लाख ५६ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.