पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ योगासन

योगासनामुळे तुमचे शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. आजकाल फास्टफूडच्या सेवनामुळे पोटाची चरबी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी बलासन हे योगासन तुम्हाला नियमित कराव लागेल, हे केल्याने चरबी कमी करण्यास निश्चित मदत होईल. चला तर मग हे आसन कस करायच त्याची माहिती घेऊ.

1. मॅटवर ताठ बसा आणि कमर सरळ ठेवा. त्यानंतर एक मोठा श्वास घ्या आणि तुमचे पोट, मान समोरच्या बाजूला झुकवा. त्यानंतर दोन्ही हात पाठीवर ठेवा, आणि तुमचे डोके हे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. हे जितक शक्य आहे तेवढ करण्याचा प्रयत्न करा.

2. त्यानंतर श्वास सोडा आणि परत एकदा तुमचे शरिर वज्रासनाच्या स्वरूपात आणा आणि स्थिर व्हा.

3. हे आसन केल्याने होणारे फायदे – ज्या लोकांना अतिउच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. या आसनामुळे कफ आणि अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.