मुंबई – भारताचा 19 वर्षीय तिरंदाज प्रथमेश जावकरने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या कंपाउंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून नेदरलँडच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या माइक श्लोएसरचा पराभव केला. भारताने ऑलिंपिकेतर स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली.प्रथमेश हा मूळचा बुलढाण्यात आहे. प्रथमेशने सुरुवातीपासून उत्तम खेळ केला.
प्रथमेशच्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या माईकचा पराभव केला .यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून माईक पहिल्या क्रमांकावर होता.
प्रथमेशने काल झालेल्या शांघाय चायना वर्ल्ड कपमध्ये जगातील टॉप खेळाडूंना हरवत फायनलमध्ये पोहचला होता. यानंतर त्याची फायनल स्पर्धा ही नेदरलँडचा नंबर वन खेळाडू माईकसोबत झाली. माईकचा पराभव करत प्रथमेशने भारताला गोल्ड मिळवून दिले.
अशी झाली फाईट
पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी समान २९ गुण मिळवले होते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत दोन्ही तिरंदाज लक्ष्य भेदण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पाचव्या फेरीत माइकने चूक केली. आणि त्याचा लाभ घेत प्रथमेशने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.
Just incredible. He seems like he has nerves of steel and a laser-sharp focus. A champion in the making. You’re right, @SudhirPuthran I hadn’t heard of him until today but will track him from now on. I hope he triumphs in the final in Hermosillo in September. May he Rise! https://t.co/fJe3KLfCUz
— anand mahindra (@anandmahindra) May 21, 2023
माईकच्या या यशानंतर सोशल मीडियासह विवध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. बजाज ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी प्रथमेशचे कौतुक करत एक ट्विट केले आहे. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रथमेशचे अभिनंदन करत एक पोस्ट शेअर केली आहे.
भारताचा सुवर्ण तिरंदाज!
भारताचा उदयोन्मुख तिरंदाज प्रथमेश जावकर याने विश्वचषक तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नेदरलँड्सच्या माइक श्लोएसरला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्ण कामगिरी बद्दल प्रथमेश जावकरचे हार्दिक अभिनंदन!#worldchampion #archery… pic.twitter.com/SMwD2P6BVj— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 22, 2023