आरामता (लेबेनान) : सेबेनानमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाने आज निवडक प्रकारांसमोर आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. दक्षिण लेबेनानमधील एक प्रशिक्षण स्थळावर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून तेथील लष्करी प्रशिक्षण प्रत्यक्ष दाखवण्यात आले.
मास्क घातलेल्या हिज्बुल्लाच्या दहशतवाद्यांनी याप्रसंगी अनेक चित्तथरारक युद्धकौशल्ये सादर केली. इस्रायल आणि लेबेनानच्या सीमाभागातल्या टेकडीवरील इस्रायलचे ध्वज असलेली ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. इस्रायलच्या रणनितीला आव्हान देण्यासाठी आपले सामर्थ्य किती अद्ययावत आहे, हे या कसरतींद्वारे दाखवण्यात आले.
दक्षिण लेबेनानमधून 25 मे 2000 रोजी इस्रायलच्या सैन्याने माघार घेतली होती. हा दिवस लेबेनानच्या वतीने विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने हिज्बुल्लाने हे शक्तीप्रदर्शन केले आहे.
अलीकडेच गाझा भागामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षात वाढ झाली आहे. गाझामधील सत्तारुढ हमास आणि हिज्बुल्लामध्ये दीर्घकाळापासूनचे जवळचे संबंध आहेत.