बालेवाडी : उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी २४ एप्रिल ते २ जून पर्यंत दुपारी १ ते ३ या वेळेत बाणेर येथील हॉटेल भैरवी जवळ बाणेर म्हाळुंगे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सायकल, दुचाकी स्वार, चारचाकी वाहनचालकांसाठी मोफत थंडपेय देण्याचे आयोजन केले आहे.
त्यानुसार या वेळी या हॉटेलमधील कर्मचारी येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना मोफत थंड पेयाचे वाटप करत आहेत. तसेच इथे पाणपोईही बसविण्यात आली आहे.
नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वरा फाउंडेशन कडून एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. अशा प्रकारचा उपक्रम सर्व शहरात राबविण्याची गरज असल्याचे रामदास मुरकुटे यांनी सांगितले