नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यासाठी त्या सध्या नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्रालयात दाखल झाल्या आहेत. सीतारामण सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Nirmala Sitharaman arrives at North Block ahead of Union Budget 2023 presentating today
Read @ANI Story | https://t.co/L8FdzniAWG#NirmalaSitharaman #UnionBudget2023 #UnionBudget #BudgetSession pic.twitter.com/OpYZCuw5lz
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2023
दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. यापूर्वी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी पूजा केली. पूजा करून ते सध्या संसदेकडे रवाना झाले आहेत.
Delhi | MoS Finance Dr Bhagwat Kishanrao Karad offers prayers before the presentation of the Modi government's Union Budget 2023
This is the BJP government's last full budget before the 2024 general elections pic.twitter.com/UoxQm24gRP
— ANI (@ANI) February 1, 2023
अर्थसंकल्पाच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात नेमका काय घोषणा केल्या जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.