नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातील माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षातील भारताचा विकासदर कमी होऊन 6.5% होण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीमुळे भारताच्या जागतिक व्यापारावर परिणाम होणार असल्यामुळे हा विकासदर कमी होणार आहे. आज सादर होणाऱ्या बजेटपूर्वी शेअर बाजारामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली.
तज्ञांच्या मते, शेअर बाजारात तेजी दिसून येणार.आगामी निवडणुका आणि सर्वसामान्यांसाठी हे बजेट फार महत्वाचे आहे. सरकार सर्वसामान्यांचा विचार करून या बजेट सादर करणार असल्याची आशा सर्वांना आहे. म्हणूनच बजेटपूर्वी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.
बेजटपूर्वी शेअर बाजारात चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांच्या वाढीसह 60 हजार अंकांच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, निफ्टीने 13 अंकांच्या किंचित वाढीसह 17600 अंकांची पातळी ओलांडली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले होते.
दृष्टिक्षेपात सर्वेक्षण
2023-24 मध्ये विकासदर 6.5% राहणार
भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त
सरकारची भांडवली गुंतवणूक चालूच राहणार
ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्याची शक्यता
कर्जपुरवठा वाढणार
भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था
महागाई 6.8% दरम्यान राहणार
रुपयावरील दबाव कायम राहणार
निर्यातीवर परिणाम कायम राहणार
घरांची मागणी वाढत राहणार
शेअर बाजाराकडून सकारात्मक परतावा