क्रिकेटमध्ये अनेकवेळा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम झेल टिपतात. काही वेळा तर आपण विचारही करू शकत नाही अशा प्रकारचे झेल टिपण्याची कमाल खेळाडू करतात. कित्येक सामन्यात तर खेळाडूंनी टिपलेल्या झेलमुळे संपूर्ण सामन्याची दिशाच बदलल्याचे पहिले आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये ‘कॅच विन द मॅच’ अशी एक प्रसिद्ध म्हणही आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग या स्पर्धेत असाच एक अप्रतिम झेल खेळाडूने टिपल्याचे पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
IPL 2023 साठीच्या लिलावाची घोषणा; ‘काव्या मारन’ पुन्हा चर्चेत, यंदा सर्वात जास्त पैशे खर्च करणार
‘बिग बॅश लीग’ स्पर्धेतील पहिला सामना आज सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मेलबर्न संघाचा खेळाडू ब्रॉडी काउचने ( Brodie Couch ) अप्रतिम झेल घेण्याची कमाल करून दाखवली. झेल पकडताना त्याला ५ प्रयत्न करावे लागले. ही घटना सिडनी थंडर संघाची फलंदाजी सुरु आसताना पहिल्याच षटकात पाहायला मिळाली. ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू गिलकिसने फ्लिक शॉट खेळला. हा चेंडू थेट शॉट थर्ड मॅनवर उभा असलेल्या ब्रॉडी काउचकडे गेला आणि त्याने विचित्र असाच झेल टिपला. एक विचित्र किंवा चमत्कारी झेल दिसला.
IPL 2023 साठीच्या लिलावाची घोषणा; ‘काव्या मारन’ पुन्हा चर्चेत, यंदा सर्वात जास्त पैशे खर्च करणार
One of the more ridiculous catches you will see! #BBL12 @BKTtires | #GoldenMoment pic.twitter.com/mppFakDxgC
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2022
हा झेल टिपताना ब्रॉडीचा ( Brodie Couch ) तोल गेला आणि चेंडू त्याच्या हाताला लागला आणि वरच्या दिशेने उसळला. यावेळी तो स्वतः पूर्णपणे जमिनीवर पडला होता. पण असे असतानाही त्याने हात आणि पायाच्या साहाय्याने झेल पकडला. हा झेल पाहून जणू क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात नेत्रदीपक झेल आहे, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या झेलची मोठी चर्चा होत असून ब्रॉडीचीदेखील प्रशंसा केली जात आहे.