आयपीएल ( IPL ) स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा लिलाव म्हटलं की सर्वांच्याच भुवया उंचावतात. कारण या लिलावात प्रतिभावान खेळाडूंवर अक्षरश पैशांचा पाऊसच पडतो. दरम्यान, आयपीएल २०२३ ( IPL 2023 )च्या लिलावाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. BCCI ने या लिलावासाठीची खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये ९९१ खेळाडूंनी आपापली नावे नोंदवली असून त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी अगोदरच निवडले आहेत. त्याचबरोबर फ्रँचायझींकडून अतिरिक्त ३० खेळाडूंचे नावं सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या लिलावासाठी ४०५ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. २३ डिसेंबरला होणाऱ्या या लिलावामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे.
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो
२३ डिसेंबर रोजी चेन्नईतील कोची येथे भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता हा मिनी लिलाव सुरु होणार आहे. लिलावासाठी २ कोटी, १.५ कोटी आणि १ कोटी अशा किमतीच्या ब्रॅकेट्समध्ये खेळाडूंना ठेवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या या मिनी लिलावात भारतीय खेळाडूंपेक्षा विदेशी खेळाडूंच्या नावांचा जास्त दबदबा राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही फ्रँचायझींच्या नजरा असणार आहेत.
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!
या मोठ्या खेळाडूंचाही समावेश
यंदाच्या आयपीएल ( IPL 2023 ) हंगामासाठी अनेक मोठ्या खेळाडूंना त्यांच्या संघांनी सोडले होते. त्यामुळे आता या मिनी लिलावात मोठ्या खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा होणार आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, जो रूट, केन विल्यमसन, शकीब अल हसन, बेन स्टोक्स, इशांत शर्मा, सॅम करण, लिटन दास, जेसन होल्डर यांसारख्या बड्या खेळाडूंचे नाव या यादीत आहेत. गेल्या हंगामात विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादचे तर मयंक अग्रवालने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. मात्र दोघांनाही त्यांच्या फ्रेंचायझीने संघात कायम न ठेवता सोडले.
🚨 NEWS 🚨: TATA IPL 2023 Player Auction list announced. #TATAIPLAuction
Find all the details 🔽https://t.co/fpLNc6XSMH
— IndianPremierLeague (@IPL) December 13, 2022
१३२ विदेशी खेळाडूही झळकणार
बीसीसीआयने या मिनी लिलावासाठी एकूण ४०५ खेळाडूंच्या नावांची निवड केली आहे. या सर्व खेळाडूंपैकी २७३ खेळाडू भारतीय आहेत, तर १३२ खेळाडू विदेशी आहेत, जे या मिनी लिलावात झळकणार आहेत. या १३२ विदेशी खेळाडूंपैकी ४ खेळाडू असोसिएट देशाचे आहेत. या लिलावासाठी ११९ कॅप्ड खेळाडू, तर २८२ अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
The countdown begins for IPL 2023 Auction. pic.twitter.com/jEIVOJm2Qf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 12, 2022
जास्तीत जास्त ८७ खेळाडूच खरेदी करता येणार
या मिनी लिलावात सहभागी झालेल्या सर्व १० फ्रँचायझींकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त ८७ जागाच रिकाम्या आहेत. म्हणजेच फ्रँचायझींकडे जास्तीत जास्त एव्हढेच खेळाडू खरेदी करता येणार आहेत. यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी रिकाम्या जागा 30 एव्हढ्या आहे. खेळाडूंची सर्वाधिक मूळ किंमत ही २ कोटी रुपये अशी असून यामध्ये १९ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावासाठी ११ खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी रुपये आहे. याशिवाय मयंक अग्रवाल आणि मनीष पांडे हे दोन भारतीय खेळाडू त्या २० खेळाडूंच्या यादीत आहेत ज्यांना १ कोटी रुपयांच्या किंमतीच्या ब्रॅकेट्समध्ये स्थान देण्यात आले आहे.