लंडन – तज्ञांनी चाचणीविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर ब्रिटनने ऍस्ट्रॅजेनेकाच्या कोविड -19 या लसीवर शुक्रवारी विश्वास व्यक्त केला असून कंपनीने म्हटले आहे की, या लसीच्या कार्यक्षमतेचे निष्कर्ष अदिक अचूकपणे काढण्यासाठी आणखी एक अभ्यास केला जाऊ शकेल. दरम्यान, ब्रिटन सरकारने ऍस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीचे 100 दशलक्ष डोस मिळविले आहेत. देशभर कोव्हिड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी या लसीचा सर्वात जास्त पुरवठा केला गेला आहे. ब्रिटीश औषध निर्माता पुढील महिन्याच्या अखेरीस 4 दशलक्ष डोस देशात उपलब्ध होईल अशी अपेक्षा करत असून येत्या ख्रिसमसच्या आधी या लसीचे वाटप देशभर जरता येऊ शकेल, असा विश्वास बाळगत आहेत.
कोविड -19 विरूद्ध लस तयार करण्याच्या जागतिक शर्यतीत, स्वस्त फ्रिज तापमानासह स्वस्त दरात देण्याची क्षमता या लसीत असल्यामुळे ऍस्ट्राझेन्काच्या लसीचा शोध अनेक विकसनशील देशांकरिता एक उत्तम आअ किरण मानले जात आहे.
काही वैज्ञानिकांनी चाचणीच्या तीव्रतेबद्दल शंका उपस्थित करूनही ही घोषणा केली गेली होती की, चाचणी सहभागींच्या उपसमूहात 90% प्रभावी होते ज्यांना सुरुवातीला चुकून अर्धा डोस मिळाला आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण डोस घेतला. ऍस्ट्रॅजेनेकाने सोमवारी चाचणी डेटा जारी केला होता ज्यामध्ये असे सिद्ध झाले होते की, ब्रिटन आणि ब्राझीलमधील उशीरा टप्प्यातील चाचण्यांमध्ये प्रायोगिक लस अधिक परिणामकारक आहे.
औषध निर्माता कमी डोस वापरुन त्याच्या लसीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त जागतिक चाचणी घेण्याची शक्यता आहे. चाचणीच्या निकालांविषयी उघडपणे गोंधळ हा “लसीवरील लोकांच्या विश्वासाच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक होता. मात्र, अंतरिम निकालांमुळे ऍस्ट्रॅजेनेका लस यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाचे नियामक (एफडीए) यांनी ऍस्ट्रॅजेनेकाच्या लस चाचणीच्या निकालावर भाष्य केलेले नाही. युरोपियन मेडिसीन एजन्सीने सांगितले की, कंपनीकडून मिळाल्यानंतर लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता यासंबंधी डेटा येत्या काही आठवड्यांत मूल्यांकन करेल.